वांद्रे-कुर्ला मार्गावरील बसेसच्या मार्गात बदल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वांद्रे-कुर्ला मार्गावरील बसेसच्या मार्गात बदल

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) 
पश्‍चिम उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल हा झपाट्याने विकसित होणारा परिसर असून या परिसरामध्ये अनेक बँका, रुग्णालये, हिरे व्यापार, आयकर कार्यालय, भविष्य निर्वाह निधी तसेच प्रदर्शन मैदान आणि मुंबई क्रि केट असोसिएशनचे मैदान आहे. परिणामी, या परिसरात प्रवासी वाहतुकीचा ओघ मोठय़ा प्रमाणावर वाढलेला आहे. प्रवाशांच्या सोयीकरिता २ जूनपासून या परिसरातील बस मार्गामध्ये काही बदल करण्यात येणार आहेत.
वांद्रे रेल्वे टर्मिनस येथून बीकेसी दूरध्वनी केंद्र दरम्यान वतरुळाकार सेवेत प्रवर्तित होणार्‍या बस मार्ग क्र. बीकेसी १ या बस मार्गाचे भारत डायमंड बोर्स आणि सिटी बँक दरम्यान हॉटेल ट्रायडेंट आणि बीकेसी दूरध्वनी केंद्र मार्गे असलेले प्रवर्तन रद्द करून यापुढे हा बस मार्ग वांद्रे रेल्वे टर्मिनस आणि डायमंड मार्केट दरम्यान वांद्रे टर्मिनस-वांद्रे स्थानक-कलानगर-कुटुंब न्यायालय-भारत नगर-लक्ष्मी टॉवर-डायमंड मार्केट मार्गे चालवण्यात येणार आहे. कुर्ला स्थानक (प.) येथून कुटुंब न्यायालय दरम्यान प्रवर्तित होणार्‍या बीकेसी-२ या बस मार्गाचे हॉटेल ट्रायडेंट मार्गे असलेले प्रवर्तन रद्द करून सिटी बँक, भारत डायमंड बोर्स प्रवेशद्वार क्रमांक १ मार्गे चालवण्यात येणार आहे. वांद्रे रेल्वे टर्मिनस आणि वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया दरम्यान बीकेसी-३ ही नवीन बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. 

जलद कॉरिडॉर सी-५५, वातानुकूलित एएस-५ या बस मार्गाव्यतिरिक्त सांताक्रुझ-चेंबूर जोडमार्गावरून वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील जलद कॉरिडॉर बस मार्ग सी-५५ आणि वातानुकूलित एएस-५ चालवण्यात येतात. त्यापैकी वातानुकूलित एएस-५ हा ठाणे करिता तर जलद कॉरिडॉर बस मार्ग सी-५५ हा नवी मुंबईकरिता उपलब्ध आहे. तसेच वांद्रे रेल्वे टर्मिनस ते कुर्ला स्थानक दरम्यान चालवण्यात येणारा बस मार्ग क्रमांक २१८ रद्द करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या बस मार्गाची नोंद घ्यावी, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages