मुंबई : मुंबई शहरात वीजपुरवठा करण्यासाठी टाटा पॉवरचा मार्ग मोकळा झाला आहे. टाटाकडे पायाभूत सुविधा नसल्यामुळे बेस्ट उपक्रमाला मोठा फटका बसणार नाही. मात्र शहरातील ३00 युनिट्सच्या आत वीज वापरणार्या सुमारे पावणेसात हजार छोट्या ग्राहकांच्या वीज दरात त्यामुळे मोठी वाढ होण्याची शक्यता बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीमध्ये व्यक्त केली.
बेस्टचे एकूण वीजग्राहक - 10 लाख
वाणिज्य आणि औद्योगिक - 2 लाख 50 हजार
निवासी - 7 लाख 50 हजार
बेस्टच्या गुरुप्रसाद शेट्टी या वीज ग्राहकाने जुलै २00९ मध्ये टाटाकडे वीजपुरवठा करण्याची मागणी केली होती, परंतु टाटाने बेस्टचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले. बेस्टने ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे शेट्टी यांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाक डे (एमईआरसी) तक्रार केली होती. त्यावर निकाल देताना एमईआरसीने शेट्टी यांना टाटाने वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय बेस्टच्या विरोधात असल्यामुळे बेस्टने विद्युत अपिलीय प्राधिकरणाकडे दाद मागितली. परंतु एप्रिल २0१२ मध्ये या प्राधिकरणाने एमईआरसीचा निर्णय योग्य ठरवला. त्यामुळे बेस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने ८ मे २0१४ रोजी टाटाला मुंबईत वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले.
पण हा आदेश देत असताना बेस्टच्या पायाभूत सुविधा वापरता येणार नाहीत, अशी अट घातली. टाटाच्या मुंबईत होणार्या या प्रवेशामुळे मोठे ग्राहक टाटाकडे वळण्याची शक्यता आहे. विशेषत: शहरातील क ापड गिरण्यांच्या जागेवर बांधण्यात येणार्या व्यावसायिक इमारतींना टाटा वीजपुरवठा करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास एमईआरसीने मंजूर केलेला बेस्टचा २0१६ पर्यंतचा बिझनेस प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. परिणामी छोट्या वीज ग्राहकांवर त्याचा आर्थिक बोजा पडेल, अशी भीती महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. टाटाच्या प्रवेशामुळे होणार्या दुष्परिणामांवर चर्चा करण्यासाठी सोमवार, १९ मे रोजी बेस्ट समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बेस्टचे एकूण वीजग्राहक - 10 लाख
वाणिज्य आणि औद्योगिक - 2 लाख 50 हजार
निवासी - 7 लाख 50 हजार
