मुंबई पालिकेत निवृत्त अधिकाऱ्याला बढती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई पालिकेत निवृत्त अधिकाऱ्याला बढती

Share This
मुंबई - स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एका अधिकाऱ्याला मुंबई पालिकेने चक्क बढती देण्याचा प्रकार घडला आहे. पालिकेच्या गलथान कारभाराचे अनेक नमुने अनुभवास येतात. हा किस्सा त्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे याविषयी चर्चा सुरू आहे. माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी प्रशासनाच्या या निष्काळजीबाबत महासभेत ताशेरे ओढले. 
पालिकेच्या स्थापत्य अभियंता विभागातील उपअभियंता ए. एस. व्हेलोरिया यांनी 2 मेपासून स्वेच्छानिवृत्ती घेतली. कर्मचाऱ्याला स्वेच्छानिवृत्ती घ्यायची झाल्यास एक ते तीन महिने आधी प्रशासनाकडे अर्ज द्यावा लागतो. व्हेलोरिया यांनी महिन्याभरापूर्वी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना 2 मेपासून स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली आहे. काल (ता. 8) प्रशासनाने त्यांच्या बढतीचा प्रस्ताव महासभेत मंजूर केला. माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी आज महासभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून याकडे लक्ष वेधले. हा प्रशासनाचा गलथानपणा असल्याचे नमूद करीत त्यांनी ताशेरे ओढले. उपमहापौर मोहन मिठबावकर यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages