गुजराती दैनिकाच्या जाहिरातीमुळे वाद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गुजराती दैनिकाच्या जाहिरातीमुळे वाद

Share This
मुंबई - बेस्टच्या सुमारे साडेतीनशे बसवर एका गुजराती दैनिकाने लावलेल्या जाहिरातीमुळे मराठी व गुजराती भाषकांत वाद निर्माण होईल, असा आक्षेप मनसेने घेतला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. या जाहिराती काढून टाकाव्यात, अशी मागणी शुक्रवारी मनसेने बेस्ट समितीच्या बैठकीत केली. बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी जाहिराती काढून टाकण्याचे आश्‍वासन दिले आहे. 
"संदेश' हे गुजराती दैनिक मुंबईतून महिन्याभरापासून प्रसिद्ध होऊ लागले आहे. या वृत्तपत्राने बेस्टच्या बसवर जाहिराती लावल्या आहेत. "मुंबईची आर्थिक प्रगती आणि बौद्धिक विकास कुणामुळे झाला? आपल्या गुजराती माणसांमुळेच' अशा आशयाची ही जाहिरात आहे. यामुळे मराठी माणसांच्या भावना दुखावल्या असून या जाहिराती तात्काळ काढून टाका, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा बेस्ट समितीच्या बैठकीत महापालिकेचे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी दिला. मुंबई स्वतंत्र करण्यासाठी 105 हुतात्मे झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईसाठी मोठे योगदान दिले. ही जाहिरात त्यांच्या बलिदानाला आणि त्यागाला काहीच अर्थ नाही, असे दर्शवणारी आहे. मराठी आणि गुजराती भाषकांत यामुळे वाद निर्माण होईल, असा आक्षेप देशपांडे यांनी घेतला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages