मुंबई - मुंबईची तहान भागवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय जल विकास संस्थेचा विस्तृत विकास आराखडा दोन महिने आधीच तयार झाला आहे. या प्रकल्पानुसार गुजरातमधील दमणगंगा आणि पिंजाळ या दोन नद्यांच्या जोडणी प्रकल्पातून मुंबईला दर वर्षी ५ हजार ७९० लाख घनमीटर पाणी मिळू शकणार आहे.
दमणगंगा नदीच्या पात्रातील अतिरिक्त पाणी मुंबईपर्यंत पोहोचण्याआधी पिंजाळ नदीत सोडण्यात येईल आणि तेथून तीन धरणे आणि दोन कालव्यांतून ते मुंबईला पुरवण्यात येणार आहे. मुंबईची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे येथील माणसांचे लोंढे दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी, मुंबईची पाण्याची मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढत आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निरीक्षणानुसार 2014 मध्ये मुंबईत घरगुती वापराच्या पाण्याची मागणी वाढली आहे. दररोज जवळपास 60 हजार 800 लिटर पाणी कमी पडत आहे. दमणगंगा आणि पिंजाळ या नद्या जोडल्यावर मुंबईला घरगुती वापराकरिता दररोज जवळपास 1 कोटी 60 हजार लिटर पाणी पुरवणे शक्य होणार आहे. त्या व्यतिरिक्त दररोज 80 हजार 650 लिटर पाणी प्रस्तावित पिंजाळ धरणातून मिळणार आहे.
2012 मधील आकडेवारीनुसार मुंबईतील 1 कोटी 80 लाख लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी दररोज 4 कोटी 50 हजार 290 लिटर इतकी होती. पाणीपुरवठा दररोज फक्त 3 कोटी 6 हजार 750 लिटर होत होता.