मुंबई - राज्यातील ८४ व्हीआयपींसाठी एकूण ८१२ पोलीस अधिकारी आणि सुरक्षा रक्षक जुंपण्यात आले आहेत अशी धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विहार धु्रव यांनी मिळविलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
त्यापैकी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासाठी ४६, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ३१ तर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी तब्बल २५ सुरक्षा रक्षकांचा ताफा ठेवण्यात आला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारीया यांना ‘झेड’ सुरक्षा व्यवस्था असून त्यांच्यासाठी देखील प्रत्येकी १५ ते २२ पोलीस तैनात असतात. या व्यतिरिक्त क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, आमदार अबू आझमी, खासदार मिलिंद देवरा आणि माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनाही ‘वाय’ सुरक्षा व्यवस्थेचे कवच आहे.
