दलित अत्याचारावर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने कडक धोरण करावे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 May 2014

दलित अत्याचारावर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने कडक धोरण करावे

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील नितीन आगे खून प्रकरण तसेच जालना जिल्ह्यात मातंग समाजातील सरपंचाची हत्या असे अनेक गंभीर प्रकरणे पुरोगामी महाराष्ट्र राज्यात वरचेवर वाढत आहेत. वाढत्या दलित अत्याचारांच्या घटना घडू नयेत, यासाठी शासनाने कडक धोरण अवलंबवावे व संबंधितांवर योग्य ती कडक कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)च्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा संगीताताई आठवले यांनी पोलीस अधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 
राज्यभर दलित समाजावर वाढत असलेल्या अत्याचार विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑप इंडिया (ए)च्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. संगीताताई आठवले यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील वारजे माळवाडी महामार्गावर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मानले जाते. मात्र या महामानवांच्या विचारांना तिलांजली देत येथील काही समाजकंटक दलितांवर दिवसेंदिवस अन्याय अत्याचार करत आहेत. अनेक ठिकाणी दलित बांधवांची हत्या होत आहे. महिलांवर अत्याचार केला जात आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन वाढत्या अत्याचाराला एक प्रकारे साथ देत असल्याचे संगीताताई आठवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. 

या बाबतचे निवेदन त्यांनी वाजरे मालवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना दिले. या वेळी अजय भालशंकर, शशिकांत कांबळे, अंजली सोनवणे, प्रभा कांबळे, छाया गायकवाड, विजया वाघमारे, संगीता कांबळे, सुदर्शन जोगदंड, विजय पंडित, अशोक भालेराव, शोभा भोलेशंकर, अरुण साखळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS