मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात २००१ ते २०१४ या १३ वर्षांमध्ये १६ हजार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्धं झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी पालिकेच्या सर्व रुग्णालयात किती रुग्ण उपचारासाठी दाखल झाले किती रुग्ण दगावले इत्यादीची माहिती मागविली होती.
त्यानुसार सन २००१ ते २०१४ या १३ वर्षाच्या काळात ५५ लाख ९५ हजार १५६ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी १६ हजार १४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली आहे. या आधी पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये १३ वर्षांमध्ये ३३ लाख ६ हजार ६५० रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी २९ हजार ६५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शिव रुग्णालयामध्ये १ करोड ९१ लाख ९७ हजार ६८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते त्यापैकी ६३ हजार ३१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सन २००१४ जानेवारी फेब्रुवारी महिन्यात ८९४ रुग्णांचा मृत्यू आहे. पालिकेच्या सर्व रुग्नालयांपैकी नायर,शिव आनी राजावाडी यामध्ये १३ वर्षात रुग्णालयामध्ये १ लाख ९ हजार ८७१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
