नितीन आगे हत्येविरोधात आझाद मैदानात निदर्शने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नितीन आगे हत्येविरोधात आझाद मैदानात निदर्शने

Share This
मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील नितीन आगे या दलित विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी विविध संघटनांतर्फे आझाद मैदानात धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. यावेळी "मनुस्मृती'चे दहन करण्यात आले, अशी माहिती "युवा सरकार'च्या अध्यक्ष पूजा बडेकर यांनी दिली. मराठी भारती, विद्यार्थी भारती, वाघिणी, अवामी भारत, भारत बचाओ आंदोलन, सकल मागास समिती आदी संघटनांनी या आंदोलनात भाग घेतला. 
नितीन आगेच्या मारेकऱ्यांवर देशद्रोहाची कलमे लावावीत, दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना आखाव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. किशोर जगताप, ज्योती बडेकर, प्रदीप ढोबळे, एस. एस. यादव, मनोज टेकाडे, निलेश लोकरे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. जातीभेदापायी हत्या करणाऱ्यांची संपत्ती सरकारने ताब्यात घ्यावी, अशी मागणी किशोर जगताप यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages