रामदेवबाबांवर मुंबईत एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रामदेवबाबांवर मुंबईत एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Share This
मुंबई - दलित समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी योग गुरू रामदेवबाबा यांच्याविरुद्ध मुंबईच्या आझाद मैदान पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना रामदेवबाबा यांनी राहुल गांधी हनिमून करण्यासाठी दलितांच्या घरी जातात असे वादग्रस्त विधान करून दलित समाजाचा अवमान केला होता. त्या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. या प्रकरणाची गंभीर दखल महिला हक्क संघर्ष समिती, दलित अत्याचार विरोधी कृती समिती, आंबेडकरी मिशन यांसारख्या संस्थांनी घेतली. ऊर्मिला पवार, सुबोध मोरे, सुजाता गोठोस्कर व अन्य पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन आझाद मैदान पोलिसांना दिले होते. त्यानुसार आज या प्रकरणी रामदेवबाबांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती आझाद मैदान पोलिसांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages