जिवंत व्यक्तीचा जीवनपट शालेय अभ्यासक्रमात नको - नरेंद्र मोदीं - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जिवंत व्यक्तीचा जीवनपट शालेय अभ्यासक्रमात नको - नरेंद्र मोदीं

Share This
नवी दिल्ली : एखाद्या जिवंत व्यक्तीचा जीवनसंघर्ष शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याला आपला ठाम विरोध आहे, असे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी आपला जीवनपट शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास ठाम विरोध दर्शवला आहे.
गुजरातमधील आनंदीबेन पटेल तथा मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील काही ठळक घटनांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. त्यावर तीव्र हरकत घेत नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपला जीवनसंघर्ष पाठय़पुस्तकात समाविष्ट करण्यास ठाम विरोध दर्शवला. काही राज्ये नरेंद्र मोदी यांच्या जीवनसंघर्षाला आपल्या शालेय अभ्यासक्रमात स्थान देत असल्याचे वृत्त आपल्या निदर्शनास आले आहे. याला आपला ठाम विरोध आहे. 

हयात असलेल्या व्यक्तीचा जीवनपट पाठय़पुस्तकात समावेश करण्यास आपण दृढतेने विरोध करतो. भारताचा इतिहास अनेक दिग्गजांच्या गाथांनी भरून पडला आहे. त्यामुळे तरुणांनी या महान व्यक्तींचा अभ्यास करून त्यांचे अनुकरण केले पाहिजे, असे मोदींनी 'ट्विटर'वरून म्हटले आहे. दुसरीकडे मोदींच्या या स्पष्टोक्तीनंतर गुजरात सरकारने मोदींचा 'पाठ' अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेण्याचा विचार सोडून दिला असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा यांनी दिली आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारनेही मोदींचा जीवनपट अभ्यासक्रमात समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांच्या इच्छेखातर आम्ही त्यांचा जीवनपट शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे या दोन्ही राज्यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages