मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मुंबईला पाणीपुरवठा करणार्या जलाशयांमध्ये ७४ दिवस पुरेल इतका साठा आहे. त्यामुळे मुंबईकरांना सध्या तरी काळजीचे काहीच कारण नाही. त्यातच पावसाचेही आगमन वेळेतच होणार आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली. यंदा ९४ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र ८0 टक्के पाऊस पडला तरी त्याचा तितकासा परिणाम जाणवणार नाही, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या मोडक सागर तलावात ६६८६९ मिमी., तानसा तलावात २९ ७२५ मिमी., विहार तलावात ३११३ मिमी., तुळशी तलावात २९५४ मिमी., अप्पर वैतरणा जलाशयात २६0११ मिमी., भातसामध्ये ११९२८४ मिमी. इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, गेल्या वर्षी या तलावांमध्ये १६0६४६ मिमी. इतका पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे, असे पालिकेच्या जल अभियंता विभागातील अधिकार्यांचा दावा आहे.
Post Top Ad
31 May 2014
Home
Unlabelled
तलावात ७४ दिवस पुरेल इतका जलसाठा
तलावात ७४ दिवस पुरेल इतका जलसाठा
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

