मुंबई - बेस्ट उपक्रमात भारंभार संघटनांचे पेव फुटलेले असताना त्यातील तब्बल दहा संघटनांचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या दहा संघटनांमध्ये ‘राष्ट्रवादी बेस्ट कामगार युनियन’ आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांची ‘समर्थ बेस्ट कामगार संघटना’ आणि मनसेच्या संघटनेचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राष्ट्रवादीला आणि राणेंना पुन्हा झटका बसला आहे.
बेस्ट उपक्रमात तब्बल १७ संघटना कार्यरत आहेत. त्यापैकी ज्या संघटनांकडे ५ टक्क्यांपेक्षा कमी कर्मचारी आहेत त्यांचे अधिकार एप्रिलपासून काढून घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रक काढून प्रशासनाने दहा संघटनांची नावे जाहीर केली आहेत. ‘बेस्ट’मधील सतरा संघटनांपैकी शरद राव यांच्या ‘बेस्ट वर्कर्स युनियन’कडे सर्वाधिक सदस्य आहेत.
चेक ऑफ फॅसिलिटी जाणार
बेस्टच्या कामगारांच्या पगारातून त्यांच्या संघटनेला ठरावीक शुल्क थेट पगारातून वळते केले जाते. ही ‘चेक ऑफ फॅसिलिटी’ या दहा संघटनांची रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमातील या संघटनांचे अस्तित्व संपणार आहे.
बेस्टच्या कामगारांच्या पगारातून त्यांच्या संघटनेला ठरावीक शुल्क थेट पगारातून वळते केले जाते. ही ‘चेक ऑफ फॅसिलिटी’ या दहा संघटनांची रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमातील या संघटनांचे अस्तित्व संपणार आहे.
संघटना
बेस्ट कामगार युनियन - (दत्ता सामंत यांची)
बेस्ट एम्प्लॉईज युनियन - (नितीन भाऊराव पाटील)
बेस्ट कामगार संघटना - (उदय भट)
राष्ट्रवादी बेस्ट कामगार युनियन
बेस्ट परिवर्तन कर्मचारी संघ - नारायण फेणाणी
समर्थ बेस्ट कामगार संघटना - नारायण राणे
बेस्ट कामगार क्रांती संघ - विठ्ठलराव गायकवाड
बेस्ट जागृत कामगार संघटना
महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेना - मनसे
बेस्ट बहुजन एम्प्लॉईज युनियन - (मनोज संसारे)
