माध्यमांवर हल्ला; द्रमुकच्या कार्यकर्त्यांना अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

माध्यमांवर हल्ला; द्रमुकच्या कार्यकर्त्यांना अटक

Share This

चेन्नई - द्रमुकचे (डीएमके) नेते एम. के. स्टॅलीन यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी रात्री माध्यमांच्या तीन प्रतिनिधीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज (सोमवार) पोलिसांनी द्रमुकच्या अकरा कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची स्वीकारत स्टॅलीन यांनी रविवारी राजीनामा दिला होता. याबाबत स्टॅलीन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलेल्या माध्यमांच्या तीन प्रतिनिधींना द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणी चेन्नई प्रेस क्लबने या हल्ल्याचा निषेध केला आहे. स्टॅलीन यांच्या निवासस्थानाबाहेर आपले कर्तव्य बजावत असताना पत्रकारांवर हल्ला झाल्याचे, सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशीही मागणी प्रेस क्लबकडून करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages