२३ मे रोजी बँकांचा संप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२३ मे रोजी बँकांचा संप

Share This
मुंबई : विविध बँक कर्मचारी संघटनांनी पी.जे. नायक समितीच्या शिफारसींविरोधात २३ मे रोजी संप करण्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या कोणत्याही प्रयत्नांचा आम्ही ठाम विरोध करू, असे या कामगार संघटनांनी म्हटले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपली भागीदारी घटवून ५0 टक्केपेक्षा कमी केली पाहिजे, असा प्रस्ताव या समितीने सरकारला दिला आहे. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस विश्‍वास उटगी यांनी सांगितले की, १0 लाख बँक कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या पाच राष्ट्रीय कर्मचारी संघटनांनी नायक समितीच्या शिफारशींना विरोध केला आहे. या पाच संघटनांच्या वतीने २३ मे रोजी देशभरात निदर्शने करण्यात येणार आहेत. या संघटनांमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन तसेच इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस या संघटनांचा समावेश आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages