दादरच्या केशवसूत पुलाखालील दुकाने, पार्किंग पालिका हटवणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दादरच्या केशवसूत पुलाखालील दुकाने, पार्किंग पालिका हटवणार

Share This
मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव पालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयाने दादरच्या केशवसूत पुलाखालील दुकाने, चौक्या आणि पार्किंग हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात सोमवारी झाली असून पहिल्याच दिवशी पालिकेने आपल्याच तीन चौक्या हटवल्या. या पुलाखालील 'अवनी ट्रस्ट' संचालित हॉटेलसह अन्य दुकाने व पार्किंग हटवण्यात येतील; पण येथून हटवण्यापूर्वी पर्यायी जागा देण्याची मागणी दुकानदारांनी आणि अन्य व्यावसायिकांनी केली आहे. यापैकी बर्‍याच दुकानदारांकडे पालिकेने दिलेले परवानेही आहेत. या सर्वांना याबाबतच्या नोटिसा पालिकेने दोनवेळा बजावल्या आहेत. 
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार पालिकेने केशवसूत पुलाखालील दुकाने, चौक्या आणि पार्किंग हटवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी जी-उत्तर कार्यालयाने सुरू केली. सोमवारी पालिकेने आपल्याच तीन चौक्या हटवण्याची कामगिरी बजावली असून मंगळवारपासून दुकाने आणि पार्किंग हटवण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, असे पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांनी सांगितले. ही दुकाने, चौक्या आणि पार्किंग हटवण्याबाबतची नोटीस पालिकेने संबंधितांना एक महिन्यापूर्वी आणि तीन दिवसांपूर्वी दिली होती. यापैकी बर्‍याच दुकानदारांनी पालिकेला परवाना शुल्कही भरलेले नाही, असे क ळते. येत्या १५ दिवसांत पुलाखालील अधिकृत-अनधिकृत दुकाने आणि चौक्याही हटवण्यात येणार आहेत; पण त्याला दुकानदारांनी विरोध केला असला तरी उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ही कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती उघाडे यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages