नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या खासदारांनी आपल्या निवडणूक खर्चात पेड न्यूजचा खर्च जाहीर केला नाही तर त्यांनाही अपात्र ठरवण्यात येणार आहे. निवडणूक आयोग या वेळी प्रथमच लोकसभा सदस्यांविरुद्ध पेड न्यूजबद्दल कारवाई करणार आहे. आयोगाने देशभरातून नोंदवण्यात आलेल्या तीन हजार तक्रारींपैकी ७९0 तक्रारी पेड न्यूजबद्दल आहेत. तसेच, त्यामध्ये अनेक प्रमुख विजयी उमेदवारांचा समावेश असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. यूपीए सरकारमधील काही मंत्री, तसेच भाजपाचे नेते आणि प्रादेशिक नेत्यांचा पेड न्यूजच्या यादीत समावेश असल्याचे सांगण्यात आले.
Post Top Ad
20 May 2014
Home
Unlabelled
पेड न्यूजचा खर्च न मांडल्यास खासदार अपात्र
पेड न्यूजचा खर्च न मांडल्यास खासदार अपात्र
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

