तिवरांची कत्तल करून अनधिकृत बांधकामे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2014

तिवरांची कत्तल करून अनधिकृत बांधकामे

Displaying chita camp2.JPG
मानखुर्द / रशिद इनामदार 
मुंबई मध्ये नोकरीधंद्यासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील तसेच परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे दिवसेंदिवस मुंबईत घर मिळणे अशक्य होत आहे. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत मुंबईत बरयाच  ठिकाणी भूमाफिया सक्रिय आहेत. मानखुर्द मधील ट्रॉम्बे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असाच प्रकार घडताना दिसत आहे.ट्रॉम्बे मधील सेक्टर डी  आणि इ मध्ये भूमाफिया मोठ्या प्रमाणात तिवरांची कत्तल करून अनधिकृत झोपड्या बांधत आहे. मागील काही महिन्यांपासून हे भूमाफिया तिवरांची कत्तल करून त्याजागी मातीचा भाराव घालून झोपड्या बांधत आहेत. 
या झोपड्या ४ ते ५ लाख इतक्या किमतीत ते विक्री करीत आहेत. यातून होणाऱ्या कमाईतून पोलिस अधिकारी ,मुंबई महापलिकेचे अधिकारी यांना मोबदला दिला जातो. त्यामुळे हे अधिकारी जाणीवपूर्वक या भूमाफियांच्या  गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. सामाजिक वन विभागाने यातील भाग संरक्षित वन म्हणून घोषित केलेला आहे. तरीही राजरोसपणे हे प्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सुरु आहेत. या कामात काही राजकीय मंडळींचा आशीर्वाद या भूमाफियांना असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात बरयाच  मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी या भूमाफियांच्या टोळीवर कारवाईचा देखावा केला. सय्यद मोइनुद्दिन सय्यद करीमुद्दिन, आरिफ मलिक शेख,दानिश आणि कादिर यांच्यापैकी फक्त आरिफ मलिक शेख वर महाराष्ट्र नगर रचना कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवस शांत बसल्यावर पुन्हा ही अनधिकृत बांधकामे पूर्वीप्रमाणेच सुरु झाली. मानखुर्द परिसराला प्रदूषणाचा विळखा पडलेला असल्यामुळे या संरक्षित वनांची आवशकता आहे. भरतीच्या पाण्यापासून,त्सुनामी सारख्या आपत्तीपासून मुंबईचे संरक्षण होण्यासाठी तिवरांचे कवच असणे आवश्यक आहे. संबंधित प्रशासनांच्या गलथान कारभारामुळे भूमाफिया मोकाट आहेत व पर्यावरणाची हानी करीत आहेत. 

रेल्वेच्या हद्दीतही डेब्रिज माफियांचे राज्य 
मानखुर्द ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान महाराष्ट्रनगर जवळ डेब्रिज माफिया सक्रिय झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई परिसरात सुरु असलेल्या इमारतींच्या बांधकामातून निघणारया डेब्रिज ची विल्हेवाट लावण्याचा ठेका संतोष लोकरे, सोमनाथ, प्रवीण,मंगेश या डेब्रिज माफियांनी घेतलेला आहे. रेल्वेच्या तसेच संरक्षित वन विभागाच्या हद्दीत डेब्रिज माफिया डेब्रिज टाकत आहेत. 
या संदर्भात या डेब्रिज माफियांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता . हे काम  रेल्वेची परवानगी घेऊन सुरु आहे. भाजीचे मळे लावता यावेत म्हणून ही  भर घातली जात आहे असे सोमनाथ या डेब्रिज माफियाने सांगितलं. प्रत्यक्षात मात्र परवानगीपेक्षा जास्त डेब्रिज या भागात आणून टाकले जात आहे. डेब्रिज घेऊन येणार्या डम्पर ची वाहतूक दिवसभर सुरूच असते. 

Post Bottom Ad

JPN NEWS