मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर डबलडेकर एसी एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे. सीएसटी ते मडगावपर्यंत धावणार्या एसी एक्स्प्रेसच्या चाचण्या मंगळवारी अणि बुधवारी पार पडल्या. या चाचण्या रेल्वेच्या रिसर्च डिझाइन अँण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनचे (आरडीएसओ) काही वरिष्ठ अधिकारी, मध्य आणि कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या देखरेखीखाली पार पडल्या.सीएसटी ते मडगावपर्यंत धावणार्या डबलडेकर एसी एक्स्प्रेसचे १२ डबे कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाले आहेत.
पहिल्या टप्प्यामध्ये दोन चाचण्या घेण्यात आल्या. मंगळवारी रोहा आणि मडगावदरम्यान आणि मडगाव ते रत्नागिरीदरम्यान ट्रायल घेण्यात आली, तर बुधवारी रत्नागिरीहून सकाळी १0.५७ला डबलडेकर एक्स्प्रेस रवाना करण्यात आली होती, ती रोहा येथे दुपारी ३.३८ला पोहचली. रोहा ते मडगावदरम्यान ६८ टनेल्स आहेत, त्यामुळे या मार्गावर ही ट्रेन चालवणे योग्य आहे की नाही याचा अंतिम अहवाल या चाचण्यांसाठी रेल्वेच्या रिसर्च डिझाइन अँण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनचे (आरडीएसओ) अधिकारी तयार करत आहेत. तो अहवाल मध्य रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे.ही डबलडेकर एक्स्प्रेस कधी चालवण्यात यावी, याविषयी रेल्वेच्या अधिकार्यांमध्ये प्रश्नचिन्ह आहे;
परंतु मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार ही डबलडेकर एक्स्प्रेस दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या वेळेत चालवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस पहाटे ५.२५ वाजता सुटते आणि मडगावला दुपारी २.१0 ला पोहचते तर परतीच्या प्रवासासाठी मडगावहून दुपारी २.३0ला सुटते आणि दादरला रात्री ११.0५ला पोहचते. दुसर्या एका अधिकार्याच्या म्हणण्यानुसार ही डबलडेकर ट्रेन काही विशिष्ट दिवशी प्रीमियम एक्स्प्रेसप्रमाणेही चालविण्यात येऊ शकते. डबलडेकर एक्स्प्रेसच्या एका कोचमध्ये १२0 प्रवासी बसू शकतात, तर सध्या चालवण्यात येणार्या एक्स्प्रेसच्या एका कोचमध्ये ६0-७0 प्रवासी बसतात. कोकण मार्गावर सध्या २७ ट्रेन चालवण्यात येतात. डबलडेकर एक्स्प्रेसच्या १२ डब्यांतून १४४0 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात.