स्मशानभूमीच्या वादातून दलित महिलेचा अंत्यविधी रोखला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्मशानभूमीच्या वादातून दलित महिलेचा अंत्यविधी रोखला

Share This
श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा या गावात स्मशानभूमीच्या वादातून गावकऱ्यांनी एका दलित महिलेचा अंत्यविधी रोखल्याने तणाव निर्माण झाला होता. आमदार बबनराव पाचपुते आणि तहसिलदारांनी हस्तक्षेप करून स्मशानभूमी बांधून देण्याचे आश्वासन दिल्याने वाद मिटला.

काल रात्री दलित महिला लक्ष्मिबाई आढागळे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत लाकडे नेउन टाकण्यात आली. त्यानंतर तेथे अत्यंयात्रा पोहोचली. त्यावेळी आजूबाजूच्या गावकऱ्यांनी या ठिकाणी अंत्यविधी करता येणार नाही अशी भूमिका घेत विरोध केला. यातून मार्ग निघत नसल्याने अंत्यविधीसाठी जमलेल्यांनी तेथेच मृतदेह ठेवून रास्तारोको आंदोलन सुरु केले. प्रशासनाच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. त्यानंतर अधिकारी आणि पोलिस तेथे आले आणि स्मशान भूमीचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेऊन अंत्यविधी करण्यात आला.खर्डा येथील दलित युवकाच्या खुनाची घटना ताजी असताना जिल्ह्यात दलितांची अडवणूक होण्याची ही दुसरी घटना घडली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages