अत्रे मैदान खुले करण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अत्रे मैदान खुले करण्याची मागणी

Share This
मुंबई : घाटकोपर येथील आचार्य अत्रे मैदानाचा 'वर्ल्ड रिनिवल स्पिरिच्युअल ट्रस्ट' या संस्थेशी झालेला करार संपुष्टात आला असूनही पालिकेने अद्याप या मैदानाचा ताबा घेतलेला नाही. या संस्थेच्या अनागोंदी कारभाराची तात्काळ चौकशी करून हे मैदान नागरिकांसाठी खुले करावे आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍या संस्थेवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका राखी जाधव यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली. 
या ट्रस्टला मैदानाचा ताबा १९९९ मध्ये देण्यात आला आणि त्याबाबतचा करार २00४ मध्ये संपुष्टात आला. मात्र संस्थेने अजून हे मैदान मोकळे केलेले नाही आणि हे मैदान क्रीडांगणासाठी आरक्षित असताना ही जागा ब्रह्मकुमारी विश्‍वविद्यालय या संस्थेला वापरण्यासाठी आणि देखभालीसाठी देऊन प्रशासनाने स्थानिकांवर अन्याय केला आहे. गेल्या १४ वर्षांत या संस्थेने पाण्याचे देयक भरलेले नाही आणि पालिकेच्या अटींचाही भंग केला आहे, असे जाधव म्हणाल्या. या मैदानात मुलांनी खेळू नये यासाठी संस्थेने काचेचे तुकडे टाकले असून, नागरिकांनाही येथून ये-जा करण्यास मनाई केली आहे. क्रिकेट खेळताना संस्थेच्या आवारात गेलेल्या एका १४ वर्षाच्या मुलाला संस्थेने डांबून ठेवले आणि त्याच्याविरोधात 'ट्रेस पासिंग'चा गुन्हा पोलिसांत नोंदवला, असेही जाधव म्हणाल्या.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages