मुंबई : महापालिकेच्या पी उत्तर विभाग कार्यालयाची इमारत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे या इमारतीत काम करणारे अनेक कर्मचारी, अधिकार्यांचा जीव धोक्यात असून इमारत दुरुस्तीला अग्रक्रम न देता मनमानी करून आपल्या दालनाच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्याकडून सुरू असल्याची तक्रार पी उत्तर विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष सिरील डिसोझा यांनी आयुक्तांना केली आहे. यापूर्वी पी उत्तर विभागाची संपूर्ण इमारत अमिताभ बच्चन यांना चित्रीकरणासाठी देऊन जैन वादाच्या भोवर्यात अडकले होते.
पी उत्तर विभाग कार्यालयाची इमारत ३0 वर्षे जुनी असून अनेक ठिकाणी भिंतीचे प्लास्टर पडले आहे. काही ठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत. येथे काम करणार्या अनेक अधिकारी, कर्मचार्यांच्या जीवितास धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने इमारतीची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक होते. त्यानुसार प्रशासनाने इमारत दुरुस्तीचा निर्णय घेतला, मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत हे महत्त्वाचे काम अडकले. मात्र, जैन यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आपल्या दालनाचे नूतनीकरण व सुशोभिकरण सुरू केले.
यासाठी त्यांनी दालनाशेजारील इमारत विभागाच्या कर्मचार्यांचे स्थलांतर करून इमारत खात्याची जागाही आपल्या दालनात समाविष्ट करण्याचा घाट घातला आहे. दालनाच्या या सुशोभिकरण व नूतनीकरणासाठी २0 लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिलेली नाही. किंबहुना याबाबतचा प्रस्तावच समितीकडे आलेला नाही. याचा अर्थ मनमानी करत जैन यांनी स्वत:च हे काम सुरू केल्याचे बोलले जाते. पालिका सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि पी उत्तर विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष सिरील डिसोझा यांनी या संदर्भात पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे.