नितीन आगे हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करा - डॉ. मुणगेकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नितीन आगे हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करा - डॉ. मुणगेकर

Share This
मुंबई - खर्डा येथील नितीन आगेच्या हत्येचा तपास हाताळण्याच्या पद्धतीवरून प्रकरण दाबून टाकण्याची शक्‍यता जास्त आहे. यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी व तपास यंत्रणेवरील दबाव लक्षात घेता चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी मागणी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली. राज्याच्या पुरोगामी परंपरेला या घटनेने काळिमा फासला गेला. नितीनची हत्या करणाऱ्या टोळक्‍याने त्याला शाळेतून उचलून नेले; मात्र त्या वेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व मुख्याध्यापक यापैकी कोणीही आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. यानंतरही घटनेची माहिती पोलिसांना माहिती दिली नाही, यावर आश्‍चर्य व्यक्त करत मुणगेकर यांनी हा खटला ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत चालवण्यात यावा, अशी मागणी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages