रामदेवबाबांवर बहिष्कार टाकण्याची हरिभाऊ राठोड यांची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रामदेवबाबांवर बहिष्कार टाकण्याची हरिभाऊ राठोड यांची मागणी

Share This
मुंबई - दलित-आदिवासींच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याबद्दल योगगुरू रामदेवबाबा यांच्याविरुद्ध केवळ दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करणे पुरेसे नाही. अशा व्यक्तीवर संपूर्ण सामाजिक बहिष्कार टाकण्यात यावा, अशी मागणी आज आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आलेल्या निदर्शनाच्या वेळी करण्यात आली. भटक्‍या-विमुक्तांच्या या निदर्शनांसाठी राज्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत आले होते. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना रामदेवबाबांनी दलित-आदिवासींचा अवमान करणारे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा राठोड यांनी निषेध केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages