मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील ओव्हल मैदान ते विरार हा प्रस्तावित एलिव्हेटेड प्रकल्प आणि कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मेट्रो-३चा प्रकल्प एकमेकांना पूरक असल्यामुळे दोन्ही मार्गांवरील प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे प्रवासी विखरून दोन्ही प्रकल्पांचा हेतू साकारला जाणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात येत असली तरी पश्चिम रेल्वेने केलेल्या सर्व्हेक्षणातून दोन्ही प्रकल्प एकमेकांना पूरक ठरणार असल्याने त्याचा प्रवाशांना फायदाच होणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.
परेचा ओव्हल मैदान ते विरार हा सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा प्रस्तावित एलिव्हेटेड प्रकल्प आहे. त्याची उपयुक्तता तपासण्यासाठी परेने सर्व्हेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) टेंडर मागविलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या प्रकल्पावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या चर्चेनंतर एलिव्हेटेड मार्गावरील प्रवासी सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एलिव्हेटेड आणि मेट्रो तीन प्रकल्पाचा अर्धा भाग एकाच मार्गावर बांधला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या हा मुद्दा लक्षात घेऊन त्याबाबत सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एलिव्हेटेड प्रकल्प ओव्हल मैदान ते विरारपर्यंत सध्याच्या मार्गावरून नेण्याची योजना आहे, तर मेट्रो तीन प्रकल्पाचा खर्च २३ हजार १३६ कोटी रुपये आहे. या प्रकल्पाचा मार्ग कफ परेड, चर्चगेट, सीएसटी, गिरगाव, वरळी, माहिम, कलिना, आंतरराष्ट्रीय विमानतळ, सीप्झ असा असणार आहे.

त्यामुळे या दोन्ही प्रक ल्पातील स्टेशन जवळ-जवळ असल्याने तिथे प्रवासी मिळण्याविषयी शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्याचवेळी परेने घेतलेल्या सर्व्हेक्षणातून याचा काहीही फरक पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परेवर सुमारे ३५ लाख प्रवासी असून त्यापैकी विरार आणि वांद्रेदरम्यान सुमारे ११ लाख प्रवासी प्रवास करतात, त्यापैकी ४0 टक्के प्रवासी दादर ते चर्चगेट स्थानकांदरम्यान प्रवास करतात. वांद्रेमधील प्रवाशांना धारावी मेट्रो स्थानक जवळ असून त्यामधील अंतर एक किमीही नसल्याचे अधिकार्यांचे म्हणणे आहे. या दोन्ही प्रकल्पातील स्टेशन्स एकमेकांच्या जवळ जवळ असल्याने प्रवासांना त्याचा फायदाच होणार आहे. मेट्रोची सेवा सीप्झपर्यंत असली तरी इथल्या प्रवाशांची संपूर्ण शहरात वाहतूक करण्यासाठी परे मार्गावरील लोकल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.