दलित सुरक्षा कायद्याचा धाक हवा - प्रकाश बनसोडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दलित सुरक्षा कायद्याचा धाक हवा - प्रकाश बनसोडे

Share This
मुंबई : दलित सुरक्षा कायदा करूनदेखील महाराष्ट्रात मागासवर्गीय समाजावरील अन्याय, अत्याचार वाढतच आहेत. सरकारने या कायद्याचा धाक बसेल, अशी कारवाई करावी, अशी मागणी कामगार नेते प्रकाश बनसोडे यांनी केली आहे. महाराष्ट्रात दलित तरुणाने सवर्ण मुलीशी विवाह केला म्हणून त्याची हत्या होते. हा किती दुर्दैवी प्रकार आहे. जर कायद्याचा धाक असता तर असा प्रकार घडला नसता. दलित सुरक्षा कायदा सरकारने केवळ नावाला केला आहे का? असा प्रश्न बनसोडे यांनी सरकारला विचारला आहे. दलित अत्याचार रोखता येत नसल्याने सरकारची अब्रू जात आहे, याची आम्हाला लाज वाटते आहे, असे ते शेवटी म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages