घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या किती इमारतींची दुरुस्ती करायची आहे- मनोज कोटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या किती इमारतींची दुरुस्ती करायची आहे- मनोज कोटक

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या किती इमारतींची आणि सदनिकांची दुरुस्ती करावयाची आहे, याची माहिती देण्याची मागणी करणारे पत्र पालिकेतील भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी पालिकेच्या आयुक्तांना दिले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या किती इमारती आणि सदनिकाधारकांना अन्य ठिकाणी तात्पुरत्या कालावधींसाठी स्थलांतरित करणे आवश्यक आहे, अन्य सदनिकाधारकांची कोणत्या प्रकारची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे, इमारत दुरुस्तीसाठी किती निविदा मागवण्यात आल्या आहेत, त्यापैकी किती निविदा प्राप्त कंपनींना काम करण्यासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत, उर्वरित इमारती व सदनिकांच्या डागडुजीसाठी कोणते धोरण अवलंबले आहे, याची माहिती कोटक यांनी आयुक्तांकडून मागवली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages