अभियंत्यांचे धरणे आंदोलन स्थगित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अभियंत्यांचे धरणे आंदोलन स्थगित

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: मनपाच्या अभियंत्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांबद्दल मुंबई महानगरपालिका इंजिनीयर्स संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली २७ मेपासून पुकारलेले ७२ तासांचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. अभियंत्यांच्या विविध मागण्या व समस्यांबद्दल पुढील आठवड्यात महापौर, पालिका प्रशासन व अभियंत्यांच्या संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक होणार आहे. त्यात समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रशासनाने या वेळी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर अभियंते सनदशीर मार्गाने आंदोलन करतील, असा इशारा म्युनिसिपल इंजिनीयर्स असोसिएशनचे सचिव अँड़ सुखदेव काशिद व इंजिनीयर्स असोसिएशनचे सरचिटणीस साईनाथ राजाध्यक्ष यांनी दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages