मुदत संपूनही रस्तेदुरुस्ती सुरूच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुदत संपूनही रस्तेदुरुस्ती सुरूच

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: पावसाळ्यापूर्वी रस्तेदुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची मुदत संपली तरीही अनेक रस्त्यांची कामे सुरूच होती. पालिकेने 967 रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यातील 323 रस्त्यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करायची होती. 25 मेपर्यंतची मुदत त्यासाठी देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना एक ते पाच हजारांचा दंड करण्यात येणार असल्याचे मुख्य रस्ते अभियंता अशोक पवार यांनी सांगितले. काही रस्त्यांच्या बाजूला असलेल्या पदपथांची कामे शिल्लक आहेत. संपूर्ण अहवाल येत्या दोन दिवसांत तयार होईल, असेही ते म्हणाले. 

323 रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर पूर्ण होणार आहेत. अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामे सुस्थितीत आणण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर केला जाण्याची शक्‍यता आहे. पावसाळ्यात पेव्हर ब्लॉकचा टिकाव न लागल्यास नागरिकांना त्रास होऊ शकतो. पावसाळ्यापूर्वी खड्डे दुरुस्तीचीही मुदत संपली आहे; मात्र अद्याप रस्त्यावरील खड्डे दुरुस्त झालेले नाहीत. दोन दिवसांत खड्डे दुप्पट वाढले आहेत. शनिवारी शहरातील रस्त्यांवर 553 खड्डे होते ते आता 1,117 पर्यंत पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसांत फक्त 18 खड्ड्यांची दुरुस्ती झाली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages