मुंबई मध्ये फक्त १६ लाख वृक्ष - ३७ हजार वृक्ष धोकादायक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई मध्ये फक्त १६ लाख वृक्ष - ३७ हजार वृक्ष धोकादायक

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: मुंबईमध्ये सिमेंट-काँक्रिटच्या जंगलात विविध प्रकारची १६ लाख २५ हजार ८८२ वृक्ष आढळले आहेत; त्यापैकी ३७ हजार ६३0 वृक्षांची अवस्था धोकादायक असल्याचे वृक्ष गणना करताना निदर्शनास आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागाने त्यांची काही प्रमाणात छाटणी केली आहे. त्यापैकी ९१ हजार १३२ वृक्ष महापालिकेच्या रस्त्यांवर आढळले आहेत. मात्र, खाजगी आणि सरकारी जमिनींवर अवघे एक हजार ४९१ वृक्ष आढळल्याने ही बाब चिंताजनक आहे, असे मत उद्यान विभागातील एका अधिकार्‍याने व्यक्त केले. गतवर्षीच्या वृक्षगणनेच्या तुलनेत यंदाच्या गणनेत वृक्षांच्या संख्येत २५ टक्के वाढ झाली असण्याची शक्यताही या अधिकार्‍याने व्यक्त केली. 
पश्‍चिम उपनगरात अंधेरीमध्ये आणि पूर्व उपनगरात भांडुप येथे इमारतींचे जंगल दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईतील सर्वाधिक हिरवाई या दोन उपनगरांमध्ये आढळली आहे. अंधेरी पूर्व आणि भांडुपमध्ये अनुक्रमे एक लाख ५९ हजार २१७ आणि एक लाख ५६ हजार ६0८ वृक्ष आढळले आहेत. त्याखालोखाल 'के' पश्‍चिम विभागात अंधेरी आणि विलेपार्ल्यात एक लाख ३६ हजार २६२ वृक्षांची नोंद झाली आहे. गेल्या वृक्षगणनेत बोरिवलीमध्ये तब्बल एक लाख ४४ हजार वृक्षांची नोंदणी झाली असताना या वेळी मात्र येथे निराशाजनक आकडेवारी नोंदवली गेली आहे. यंदाची गणना करताना येथे फक्त ११ हजार ७३४ झाडांची नोंद करण्याची वेळ उद्यान विभागावर आली. के/पश्‍चिम अंधेरी आणि विलेपार्ल्यातील महापालिकेचा रस्ता आणि वास्तूंमध्ये सर्वाधिक म्हणजे आठ हजार ८७६ वृक्ष आणि खाजगी व सरकारी जमिनींवर ७९७ वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले. वृक्षांची छाटणी करणे, फांद्या कापणे आदी कामांसाठी पालिकेने खाजगी इमारतींकडून ३८ हजार ९१ रुपये शुल्क आकारणी केली. तर ही कामे समाधानकारक न क रणार्‍या वांद्रे आणि खार/पश्‍चिम येथील कंत्राटदारांकडून १४ हजार रुपये दंडवसुलीही केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages