मुंबईतील नाल्यांची ७५ टक्क्यांहून अधिक सफाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील नाल्यांची ७५ टक्क्यांहून अधिक सफाई

Share This
मुंबई : मुंबईतील मोठय़ा-छोट्या नाल्यांची सफाईची कामे एप्रिलपासून सुरू असून महापालिका प्रशासनाने आखलेल्या शिस्तबद्ध कार्यक्रमांमुळे आतापर्यंत नाल्यांची ७५ टक्क्यांहून अधिक सफाई झाली आहे, असा दावा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केला आहे.
आयुक्तांनी गुरुवारी पूर्व उपनगरातील नाहूर रेल्वे स्थानक, भांडुप दातार कॉलनी तसेच मध्य रेल्वेच्या मार्गाखालून जाणार्‍या कल्वर्टच्या साफसफाईची पाहणी केली तसेच चेंबूर एम-पूर्व येथील सुभाष नगर नाला, देवनार येथील रफिक नगर नाला, देवनार नाला, लोकमान्य टिळक टर्मिनसजवळील कारशेड नाला, विद्याविहार येथील रामदेव पीरमार्ग नाला या नाल्यांच्या साफसफाईचे आणि विस्तारीकरण होत असलेल्या कामांची पाहणी केली. नाल्यांच्या सफाईची कामे समाधानकारक सुरू असली तरी स्थानिक वस्त्यांमधील नागरिक प्लास्टिक व अन्य टाकाऊ वस्तू नाल्यांमध्ये टाकणार नाहीत, याबद्दल घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि संबंधित सहाय्यक आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे तसेच नाल्यांमध्ये तरंगणार्‍या वस्तू नियमितपणे काढाव्यात, असेही आदेश आयुक्तांनी या वेळी उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांना दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages