सफाई कामगारांना रेनकोटऐवजी पैसे मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सफाई कामगारांना रेनकोटऐवजी पैसे मिळणार

Share This
मुंबई - महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रेनकोटऐवजी यंदा त्यांना पैसे देण्याचा विचार प्रशासन करत आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसला, तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निविदा प्रक्रियेपेक्षा थेट पैसे देणेच योग्य वाटत असल्याची चर्चा आहे. 
पालिकेच्या सुमारे 28 हजार सफाई कामगारांना दर वर्षी पावसाळ्यात रेनकोट दिले जातात. कंत्राटदारांमार्फत रेनकोट खरेदी केली जात असल्याने पंधरवड्यात रेनकोट फाटून कामगार भर पावसात भिजतच काम करत असतात. त्याचप्रमाणे रेनकोट दिल्यावर पुन्हा 75 टक्के किमतीत तेच रेनकोट विकत घेऊन ते दुसऱ्या कर्मचाऱ्यांना दिले जात असल्याचे प्रकार यापूर्वी उघड झाले आहेत. यामुळेच यंदा रेनकोटऐवजी पैसे देण्याचा विचार सुरू आहे.दरम्यान, शालेय वस्तू वापरात होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपाला वैतागून विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात जमा करण्याचा प्रस्तावही आयुक्त सीताराम कुंटे यांनी मांडला होता; मात्र सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages