मुंबई - दहिसर पश्चिमेला असलेल्या गावठाणजवळील खारफुटीत भराव टाकण्यात येत असल्याचा प्रकार आज उघडकीस आला. या प्रकरणी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मिनी धारावी म्हणून ओळखले जाणारे दहिसर येथील वादग्रस्त गणपत पाटील नगरही खारफुटीत भराव टाकून उभे करण्यात आले आहे. येथे दरदिवशी खारफुटीची कत्तल करून बेकायदा झोपड्या उभारल्या जात आहेत. वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका वेळोवेळी कारवाई करते; मात्र पुन्हा झोपड्या उभ्या राहतात. झोपड्यांबरोबरच बिल्डरही इमारत बांधण्याआधी आजूबाजूच्या खारफुटीवर भराव टाकून ही जागा स्वत:च्या ताब्यात घेतात, असे प्रकार उघडकीस येत आहेत. दहिसर गावठाण परिसरातील खारफुटींवर भराव टाकण्यासाठी महानगरपालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही.
Post Top Ad
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

