माहिती अधिकाराचे अर्ज वेळेत निकाली काढा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

माहिती अधिकाराचे अर्ज वेळेत निकाली काढा

Share This
मुंबई - माहिती अधिकाराचे अर्ज वेळेत निकाली लागत नसल्याने थेट राज्य माहिती आयुक्तांकडे अपील होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पालिका अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली असून, सर्व अर्ज वेळेत निकाली काढण्याबरोबरच ठरलेल्या वेळेत सुनावणी घेण्याचे आदेशच पालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 
माहिती अधिकाराअंतर्गत आलेल्या अर्जांना 30 दिवसांत उत्तर देणे बंधनकारक आहे. तसे शक्‍य नसल्यास विलंबाची कारणे कळविणे बंधनकारक आहे. तसेच अर्जकर्त्याने अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील केल्यास त्याची सुनावणीही विहीत वेळेत होणे बंधनकारक आहे; मात्र पालिकेने या नियमांना हरताळ फासला आहे. ठरलेल्या वेळेत अर्ज निकाली निघत नसल्याने अर्जदार थेट राज्य माहिती आयुक्तांकडे फिर्याद मागत असल्याचे प्रकार अलीकडे वाढू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने परिपत्रक काढून सर्व अधिकाऱ्यांना अर्ज वेळेत निकाली काढण्यास सांगितले आहे. 

अनेकदा विविध विभागांचे प्रमुख माहिती अधिकाराबाबत स्वतंत्रपणे आदेश देत असतात. मात्र, यासाठी सर्व विभागांमध्ये एकच नियम असल्याने भविष्यात असे आदेश देऊ नयेत, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages