२५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्यास शाळांची टाळाटाळ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्यास शाळांची टाळाटाळ

Share This
मुंबई- शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के आरक्षणातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या मुलांसाठी खासगी शाळांची प्राथमिक शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी पालिकेने ऑनलाईन प्रक्रिया राबवली असली तरी आता या मुलांना प्रवेश देण्यास खासगी शाळांनी चालढकल टाळाटाळ चालवली आहे. पहिल्या टप्प्याचे प्रवेश घेण्याची मुदत 20 मेपर्यंत आहे; तरीही अनेक शाळांनी प्रवेश घेण्यासाठी आलेल्या पालकांना जूनमध्ये बोलावले आहे. काही शाळा गणवेश व पुस्तकांसाठी पैसे मागत आहेत. अशी तक्रार पालकांनी केली आहे.
धारावीतील शकील असगर हुसेन हा फेरीवाला आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा २५ टक्के सोडतीत मिळालेला प्रवेश घेण्यासाठी धारावीतील सेंट अँथनी शाळेत गेला होता. त्याला तिथे कुणीच दिसले नाही. शिपायाने २ जूनला येण्यास सांगितले. शीव कोळीवाडा येथील सीबीएम शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या कमुद्दिन शेख आणि अन्य दोन पालकांना वेगळाच अनुभव आला. त्यांनी सांगितले, की आम्ही मुलांना मिळालेला नर्सरीतील प्रवेश घेण्यासाठी शाळेत गेलो तेव्हा शाळेने, "आम्ही नर्सरीचे वर्गच बंद करतो आहोत', असे सांगून आम्हाला हाकलून दिले. आम्ही पोलिसांना तिथे बोलावले आणि शाळेला त्यांचे म्हणणे लेखी द्यायला सांगितले. शाळेने आमच्याकडे "आरटीईअंतर्गत एन्ट्री लेव्हल पाहिली असल्याचे' लिहून दिले. ते पत्र आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.

गोरेगाव येथील आदर्श विद्यालयाने पालकांकडून ४०० रुपये प्रवेश शुल्क मागितले. सरकारने पैसे दिले तर ते परत करू, असे शाळेने सांगितल्याची माहिती देशभक्ती आंदोलनाच्या निमंत्रक अविशा कुलकर्णी यांनी सांगितले. माटुंगा प्रीमिअर हायस्कूल, गोरेगावचे बुलबुल विद्यालय आदी अनेक शाळांनी प्रवेश घेण्यास आलेल्या पालकांना जूनमध्ये येण्यास सांगितले आहे.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages