राणें राजीनामा देण्याच्या तयारीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राणें राजीनामा देण्याच्या तयारीत

Share This
निलेश राणे याचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी निलेशचा पराभव झाला तर आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा देऊ असे सांगितले. त्याचबरोबर जनतेने दिलेला कौल आपण स्वीकारला असल्याचे सांगताना राणेंनी रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मतदारांवरही आगपाखड केली आहे. कोकणातील जनतेसाठी गेल्या २५ वर्षांपासून आपण खूप काम केले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. जनतेने दिलेला कौल आपण स्वीकारला असून, यापुढे कोकणात सुरू असलेले सर्व उपक्रम आपण थांबविणार असल्याचेही राणे यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages