नालेसफाईची कामे समाधानकारक, मुंबईवासियांना दिलासा मिळणार - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाईची कामे समाधानकारक, मुंबईवासियांना दिलासा मिळणार - उद्धव ठाकरे

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सुरू असलेली पावसाळा पूर्व नालेसफाईची कामे समाधानकारक व दर्जात्मक झाली असल्याने येणारा पावसाळा हा मुंबईकरांसाठी सुखदायक ठरेल अशी आशा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. बृहन्मुंबईतील नालेसफाई कामांच्या पाहणी दौऱया प्रसंगी प्रसार-माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
प्रसार-माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेली १५ वर्षे आपण पावसाळ्यापूर्व नालेसफाई कामांची पाहणी करीत असून सर्वसामान्य मुंबईकर नागरिकाला पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आपण आढावा घेत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, महापालिकेद्वारे करण्यात येणाऱया नालेसफाईच्या कामांसाठी राज्य व केंद्र शासनाच्या काही विभागांच्या परवानग्या आवश्यक असतात. त्या परवानग्या मिळविण्यास काही अडचणी येत होत्या, त्या पालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱयांनी या गोष्टींचा सतत पाठपुरावा करून सदर कामे मार्गी लावली आहेत. तरीही मिठी नदीवरील काही कामांना केंद्र शासनाकडून परवानग्या मिळणे बाकी आहेत. त्या परवानग्या आता केंद्रात सरकार बदलले असल्याने लवकर मिळतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.मुंबईकरांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून नालेसफाईच्या कामांना कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिलेला नाही. तसेच आता केंद्रात महायुतीचे सरकार आल्यामुळे व बृहन्मुंबई शहरातील सर्व खासदार महायुतीचे असल्याने मुंबई शहरातील विविध समस्यांबाबत महापौरांसह खासदार या समस्या त्वरित सोडवतील असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी आवर्जुन नमूद केले.

संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) (प्र.) लक्ष्मण व्हटकर यांनी यावेळी प्रसार-माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, यावर्षी मुंबई शहरातील विविध ठिकाणच्या नाल्यांची रुंदी व खोली वाढविण्यात आलेली आहे.एकूण ८ उदंचन केंद्रापैकी २ पर्जन्य उदंचन केंद्रे कार्यान्वित झाली असून त्यामुळे दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, विलेपार्ले, जे.व्ही.पी.डी., अंधेरी या विभागात पाणी साचण्याची ठिकाणे निम्म्याहून कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.आज संपन्न झालेल्या दौऱयादरम्यान मान्यवरांनी मिठी नदी पातमुख, माहीम कॉजवे (,सेनापती बापट मार्ग, दादर-धारावी पातमुख, रावळी कॅम्प नाला, माहुल खाडी, ब्राह्मणवाडी कल्व्हर्ट, अशोक नगर पूल, ब्राम्हणवाडी नाला, म.टे.नि.ल. पूल, लेलेवाडी नाला, दहिसर नदी, राष्ट्रीय उद्यान, ओंकारेश्वर मंदिर, पोयसर नदी, आशानगर नाला, कांदिवली (पूर्व),कांदरपाडा या नाल्यांच्या कामांची पाहणी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages