हृदयरोगींच्या संख्येत वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हृदयरोगींच्या संख्येत वाढ

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)
पुढील १५ वर्षांमध्ये जगभरातील हृदयरोगाच्या रुग्णांपैकी ५0 टक्के रुग्ण हे भारतात असतील व एकूण आजारांपैकी २५ टक्के आजार हा हृदयरोगाचा असेल, अशी माहिती जागतिक हृदय दिनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. करण भोसले यांनी प्रेस क्लब येथे दिली. या आजारामुळे मूत्रपिंड, डोळे यांच्यावर मोठा आघात होतो. या वेळी डॉ. भोसले म्हणाले, डोकेदुखी व अंगदुखीसारखी या आजाराची लक्षणे नसतात. त्यामुळे याला मूक मारेकरी म्हणतात. फक्त वयस्कर माणसांनाच हा आजार होत नसून तरुणांनाही होत आहे. स्त्रिया आणि लहान मुले या आजाराच्या लक्षणाकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे या गटातही हा आजार वाढत आहे. दर मिनिटाला एक असे मृत्यूचे प्रमाण या आजाराचे आहे. ३ पैकी एका महिलेचा मृत्यू या आजारामुळे होतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने रक्तदाब नियंत्रित ठेवणे अत्यावश्यक आहे, असे डॉ. भोसले या वेळी म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages