२९ मेपासून मतदार नोंदणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२९ मेपासून मतदार नोंदणी

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ मेपासून निरंतर प्रक्रियेद्वारे मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. विधानसभा मतदारसंघात पूर्वी कार्यरत असलेली सर्व मतदार मदत केंद्रे २९ मेपासून कार्यरत होत आहेत. मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात नोंदणीचा कार्यक्रम सुरू होईल. ज्यांची नावे यादीत नसतील, त्यांनी ती नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर चन्ने यांनी केले आहे. आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करण्यासाठी मतदारांनी पुढील सुविधांचा वापर करावा. हेल्पलाइन क्रमांक- १९५०१८००२२१९५०. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages