मुंबई - दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघातग्रस्तांपैकी केईएम रुग्णालयातील एकाही जखमीला अद्याप मदत मिळालेली नाही. या रुग्णालयात 13 जण उपचार घेत आहेत. रेल्वे मंत्रालयापर्यंत अद्याप ही माहिती न पोहोचल्यामुळे रुग्णांना मदत मिळालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
या अपघातातील जखमींवर केईएम, टिळक, रोहे सिव्हिल, नागोठणे ग्रामीण, जे.जे., फोर्टिस, अलिबाग, एमजीएम (वाशी), वागळे (कोलाड), रेल्वे रुग्णालय (कल्याण), लाईफ लाईन आदी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णालयांतील जखमी व मृतांची दखल सोमवारी रेल्वे प्रशासनाने घेतली. फक्त केईएममधील जखमींची माहिती रेल्वे प्रशासनाने घेतलेली नाही.
अपघाताला दोन दिवस उलटले; परंतु केईएम रुग्णालयात रेल्वेची मदत पोहोचलेली नाही. केईएममध्ये 20 जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सात जणांना प्राथमिक उपचारांनंतर घरी जाऊ देण्यात आले. 13 जणांवर उपचार सुरू होते. त्यापैकी एक जण मंगळवारी दुपारी गायब झाला. अद्याप या जखमींची चौकशी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयातून कोणीच आलेले नाही, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी एकेक अधिकारी रेल्वे प्रशासनाकडून आला होता. त्यांनी माहिती घेतली, असे रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले, की मंगळवारपर्यंत 21 मृतांपैकी 19 जणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत देण्यात आली आहे. दोन मृतांपैकी एकाची ओळख न पटल्यामुळे आणि दुसऱ्याचे नातेवाईक न आल्यामुळे मदत देता आली नाही. 21 गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत देण्यात आली आहे. 38 जणांना प्रत्येकी 10 हजारांची मदत देण्यात आली आहे. केईएम रुग्णालयातील जखमींबाबत डॉक्टरांशी चर्चा झाल्यानंतर त्यांना मदत देण्यात येईल. उद्या (बुधवार)पर्यंत ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असे पाटील म्हणाले.