मुंबई - नागोठणे येथील रेल्वे अपघातातील जखमींवर महापालिकेच्या केईएम आणि लोकमान्य टिळक रुग्णालयात मोफत उपचार करण्याची घोषणा केली होती. केईएम रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगत असल्याचा प्रकार आज उघड झाला. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
उपमहापौर मोहन मिठबावकर, भाजपचे नेते किरीट सोमय्या, महानगरपालिकेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी आज केईएम रुग्णालयाला भेट देऊन तेथील जखमींची विचारपूस केली. या वेळी एका रुग्णाने बाहेरून आणलेल्या औषधांचे बिल उपमहापौरांना दाखवले. रुग्णालयाकडून जखमींवर मोफत उपचार होणे अपेक्षित असताना डॉक्टर त्यांना बाहेरून औषध आणण्यास सांगत आहेत. हा प्रकार अयोग्य आहे. अपघातातील रुग्णांवर सर्व उपचार मोफतच झाले पाहिजे, असे विश्वासराव यांनी सांगितले, तर याबाबत पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. त्यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले.
जखमी रुग्णालयात असेपर्यंत त्यांना मोफत उपचार दिले जातात; पण रुग्णालयातून घरी पाठविल्यानंतरच्या उपचारांचा खर्च रुग्णालाच करावा लागतो. या जखमींना घरी पाठवल्यानंतरचे उपचारही मोफत करण्यात यावे, अशी मागणी कोटक यांनी केली.