लोकसभेत महिला खासदारांचे प्रमाण वाढले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकसभेत महिला खासदारांचे प्रमाण वाढले

Share This
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय घडामोडी घडल्या त्याचप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत महिला खासदारांचे प्रमाणही वाढले. सोळाव्या लोकसभा निवडणुकीत देशातील ६१ महिला खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. २००९ मधील निवडणुकीत हेच प्रमाण ५९ इतके होते. ५४३ मतदारसंघात महिलांचे प्रतिनिधित्व हे ११ टक्के आहे तर ८९ टक्के जागांवर पुरुष उमेदवारांचे वर्चस्व आहे. या लोकसभा निवडणुकीत आतापर्यंतच्या सर्वाधिक ६१ महिला खासदार निवडून आल्या आहेत. १९७७ च्या निवडणुकीत महिलांचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे १९ होते. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, हेमामालिनी आणि मनेका गांधी या बड्या नेत्यांसह किरण खेर, पूनम महाजन, सुषमा स्वराज, उमा भारती, डिंपल यादव, मून मून सेन आणि मीनाक्षी लेखी या महिला खासदारांनीही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages