ऑनलाईन प्रवेशाला मुदतवाढीसाठी आठवले गटाला आली जाग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ऑनलाईन प्रवेशाला मुदतवाढीसाठी आठवले गटाला आली जाग

Share This
रिपाईवर आपल्याच सत्तेविरोधात आंदोलन करण्याची नामुष्की  
मुंबई/ अजेयकुमार जाधव
खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये दुर्बल घटकांच्या २५ टक्के ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेबाबत सुरू असलेल्या पालिकेच्या गोंधळामुळे पालकांना आपल्या पाल्यांसाठी ऑनलाईन प्रवेश घेता आलेला नाही. त्यामुळे या प्रवेशप्रक्रियेला २५ मेपर्यंत मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी करण्याची तसेच मागणी मान्य न झाल्यास १२ मे ला आंदोलन करण्याचा इशारा देण्याची वेळ पालिकेतील सत्ताधारी महायुतीमधील आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षावर आली आहे. सत्तेमध्ये असतानाही सत्तेवर पकड नसलेल्या व पालिकेतील निर्णय घेताना रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतले जात नसल्याने आठवले गटाला आपल्याच सत्तेविरोधात आंदोलन करण्याची नामुष्की आली आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या सावळा गोंधळामुळे खाजगी अनुदानित शाळांमध्ये असलेल्या २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेत दुर्बल घटकांना ऑनलाईन प्रवेश घेता आलेला नाही. शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रवेशासाठी दिलेली मुदत दुर्बल घटकातील अनेक पालकांना माहीत नव्हती. दुर्बल घटक संगणक साक्षर नसल्याने वस्त्या आणि चाळींमध्ये शिक्षण विभागाने जनजागृती करण्याची गरज होती. जाहिरात करताना पोस्टरद्वारे शाळांतील कर्मचाऱ्यांना व शिक्षकांना त्याची माहिती द्यायला हवी होती; मात्र तसे न करता एकदा जाहिरात देऊन पालिकेने कार्यभार संपवला, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. ही योजना संबंधितांपर्यंत पोचलीच नसल्याने गोंधळ झाला आहे. 

हा गोधळ सुरु असताना पालिकेच्या सत्तेमध्ये सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्षाला त्याची जाणीव झाली नाही. आपल्या सत्तेमध्ये दुर्बल घटकांवर अन्याय अत्याचार होतो आहे का याची रिपब्लिकन पक्षाला कधी साधी विचारपूस करण्याची गरज सुद्धा वाटलेली नाही. प्रवेश प्रक्रिया सुरु असताना पालिकेने एकदा मुदत वाढ दिली हि का दिली याची कारणे सुद्धा दिली होती तरीही रिपब्लिकन पक्षाला आवाज उठवावा असे वाटले नाही. आता मुदत एकदा मुदत वाढ दिल्या नंतर त्याची मुदत संपल्यावर रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाला जाग आली असून रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी १२ मे ला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.  

तहसील कार्यालयातून पालकांना उत्पन्नाचा दाखला मिळण्यास उशीर होत आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. अशा प्रकारे घाईघाईने योजना राबविणे योग्य नाही. या योजनेचा उपयोग दुर्बल घटकांना मिळणार नसेल, तर तिचा उपयोग काय, असा प्रश्‍न त्यांनी केला आहे. शिक्षण खात्याने ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देण्याबाबत विचार करावा; अन्यथा आंदोलन करावे लागेल, असे सोनावणे यांनी पत्रकारांना सांगितले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages