केईएमच्या कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत उपोषण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केईएमच्या कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत उपोषण

Share This
मुंबई - केईएममधील कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला अद्दल घडविण्यासाठी अखेर बेमुदत उपोषणाचा निर्धार केला आहे. गुरुवार (ता. 8) पासून सुमारे दोन हजार कर्मचारी हे आंदोलन करणार आहेत. प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याने कर्मचारी आणि कामगारांनी घोषणा देऊन प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. 5 मेपासून तीन दिवस दररोज अर्धा तास अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली; तरीही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, असे केईएम कामगार आणि कर्मचारी युनियनचे चिटणीस महेश दळवी यांनी सांगितले. यासंदर्भात बुधवारी अधिष्ठात्यांना पत्र पाठविण्यात आले आहे, असेही दळवी म्हणाले; परंतु असे पत्र मिळालेले नसल्याचे प्रशासनाने सांगितले. अधिष्ठाता शुभांगी पारकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages