सबका साथ सबका विकास - मोदी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सबका साथ सबका विकास - मोदी

Share This
राजकारणात कोणीही कायमस्वरूपी शत्रू नसतो, तर केवळ एक प्रतिस्पर्धी असतो. त्यामुळे देशाला प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगत नरेंद्र मोदींनी 'सबका साथ सबका विकास' अशी नवी घोषणा दिली. भाजपाच्या या ऐतिहासिक विजयानंतर वडोदरामध्ये आयोजित सभेत बोलताना मोदींनी देशाचे आभार मानले. काँग्रेसनंतर प्रथमच स्पष्ट बहुमताच्या जोरावर येऊ घातलेले सरकार देशातील सव्वाशे कोटी जनतेचे सरकार असल्याचे मोदी म्हणाले. जनतेने मतपेटीतून दाखवलेल्या या विश्‍वासामुळे आपल्यावर मोठी जबाबदारी पडली असून त्याची आपल्याला जाण आहे. जनतेचे हे प्रेम विकासाच्या रूपाने दुपटीने परत करू, असे आश्‍वासन देतानाच मोदींनी वडोदरातून राजीनामा देत वाराणसीतून लोकसभेचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे संकेत दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages