मुंबई/ठाणे : मुंबईतील सहा तसेच ठाणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये गुजराती भाषिकांची मते टर्निंग पॉइंट ठरल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे विधानसभा, मीरा-भाईंदर आणि ऐरोली मतदारसंघात तसेच कल्याण, पालघर, भिवंडी या भागातही गुजराती मतदारांची संख्या मोठी आहे. भाजपाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यामुळे प्रांतप्रिय गुजराती मतदारांनी प्रथमच जोरदार मतदान केले. एरवी कोणत्याही निवडणुकीमध्ये मतदानासाठी गुजराती मतदार फारच कमी प्रमाणात बाहेर पडत असतात. मात्र या वेळी ते प्रथम बाहेर पडले. त्याचा फायदा शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांना झाला. परिणामी महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान झाल्याने विजयी घोडदौड राखण्यास यश मिळाले.
Post Top Ad
17 May 2014
Home
Unlabelled
गुजराती भाषिकांची मते ठरली टर्निंग पॉइंट
गुजराती भाषिकांची मते ठरली टर्निंग पॉइंट
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

