नवी दिल्ली : हा विजय सरकारविरोधातील उसळलेल्या जनक्षोभाचा आहे, असे सांगत भाजपाचे भीष्म पितामह लालकृष्ण अडवाणी यांनी या विजयाचे श्रेय नरेंद्र मोदींना देण्याचे टाळले. सहसा पक्षांकडून पराभवाचे विश्लेषण केले जाते. मात्र अडवाणींनी या विजयाचेही विश्लेषण करणार असल्याचे सांगितले. 'एनडीए'च्या विजयात नरेंद्र मोदींचे योगदान किती, भाजपा-संघ कार्यकर्त्यांचे योगदान किती आणि आमच्या सहकारी पक्षांचे योगदान नेमके किती आहे, याचा आम्ही अभ्यास करणार असल्याचे अडवाणी म्हणाले. भाजपाच्या विजयाचे श्रेय मोदींना देण्याचे टाळणार्या अडवाणींनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले. राजधानीतील भाजपा कार्यालयातील जल्लोषातही ते सहभागी झाले. गुजरातमधून निवडणूक लढण्यास फारसे इच्छुक नसलेले अडवाणी तयार झाले आणि मोदींच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने भाजपाने आपल्या या ज्येष्ठ नेत्याच्या विजयासाठी आकाश-पाताळ एक केले होते.
Post Top Ad
17 May 2014
Home
Unlabelled
सरकारविरोधी लाटेचा परिणाम - अडवाणी
सरकारविरोधी लाटेचा परिणाम - अडवाणी
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

