पालिकेच्या रुग्णालयात कॅल्शियमच्या औषधांची कमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या रुग्णालयात कॅल्शियमच्या औषधांची कमी

Share This
मुंबई - पालिकेच्या रुग्णालयात कॅल्शियमच्या औषधांची अनेक वर्षांपासून कमी असल्याची माहिती आज (ता.13) स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली. गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटदाराकडून कॅल्शियमच्या औषधांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने रुग्णांना खासगी दुकानदारांकडून औषधे विकत घ्यावी लागत आहेत.
पालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात औषधे देणे बंधनकारक आहे. मात्र,पालिकेच्या रुग्णालयात पुरेशी औषधे नसल्याबद्दल वेळोवेळी प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. मात्र,आजही या परिस्थितीत बदल झालेला नाही. स्थायी समितीत शिवसेनेच्या सदस्या डॉ.अनुराधा पेडणेकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून याकडे लक्ष वेधले. रुग्णालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कॅल्शियमच्या गोळ्यांची कमतरता आहे. के.ई.एम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागात वर्षाला तीन लाख गोळ्याची आवश्‍यकता असते, तसेच जवळ-जवळ सर्वच विभागात या गोळ्याची गरज असते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या गोळ्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात झालेला नाही. या गोळ्यांच्या पुरवठादारावर काय कारवाई करण्यात आली, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. यावर याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांनी प्रशासनाला दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages