मुंबईकरांची वाट खड्डय़ांतूनच ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 May 2014

मुंबईकरांची वाट खड्डय़ांतूनच !

मुंबई : पावसाळा तोंडावर आला असतानाही ३२८ रस्त्यांची दुरुस्ती होणे अद्याप बाकी असून, रस्त्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या रस्ते विभागाने ४0 कोटी रुपयांचे कंत्राट काढले आहे. यापैकी २८ कोटी रुपये पावसाळ्यात जुन्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते बुजवण्यासाठी खर्च होणार आहेत. खड्डे बुजवण्याची जबाबदारी या वर्षापासून विभाग (वॉर्ड) पातळीवर देण्यात आली आहे, यामुळे रस्ते विभागाच्या अभियंत्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे. 
मुंबईत एकूण एक हजार ९0३ किलोमीटरचे रस्ते असून ९६७ रस्त्यांपैकी १३२ रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे आणि ३२८ रस्त्यांच्या दुरस्तीचे काम अद्याप झालेले नाही, अशी माहिती पालिकेच्या रस्ते विभागाचे मुख्य अभियंता रमेश पवार यांनी दिली. यापैकी ५0७ रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यानंतर होणार असल्याचे ते म्हणाले. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे २0 मेपर्यंत पूर्ण करण्याची मुदत ठेकेदारांना दिली असली तरी त्यांना आणखी पाच दिवसांची मुदत गरजेनुसार वाढवून मिळणार आहे. ३१ मेपर्यंत सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर तेथे लावलेले अडथळे दूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली.

खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या रस्ते विभागाने सात कंत्राटदारांची निवड केली असून, प्रत्येकाला सुमारे चार कोटी रुपये विभागून दिले आहेत. तरीही खड्डे बुजवण्यासाठी सुमारे ३४ कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने प्रत्येक परिमंडळासाठी चार कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आणि खड्डे बुजवण्यासाठी निविदा मागवल्या. मात्र निविदाकारांनी नऊ ते तब्बल १८१ अधिक दराची बोली लावली. पालिकेने यामुळे कंत्राटदारांशी चर्चा करून ही बोली नऊ ते २७ टक्क्यांपर्यंत कमी केली. यामुळे कमीत कमी चार आणि अधिकाधिक ५.८ कोटी रुपये या कामावर खर्च होणार आहेत.
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS