मुंबई : महापालिका अभियंत्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पालिका प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करून पालिका अभियंता कृती समितीसोबत चर्चाही केली नाही, म्हणून ही समिती २७, २८ आणि २९ मे रोजी ठिय्या आंदोलन करणार आहे, असा इशारा समितीचे नेते अँड़ सुखदेव काशिद आणि साईनाथ राजाध्यक्ष यांनी दिला आहे.
पालिकेच्या अभियंत्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अभियंत्यांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासन या आंदोलनाविरोधात न्यायालयात गेले आणि त्यांनी स्थगिती आदेश मिळवला. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात झाल्यानंतर समितीने अभियंत्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. अभियंत्यांच्या प्रलंबित प्रश्नांबद्दल विचार करण्याचे निर्देशही न्यायालयाने सांगितले. त्यामुळे कृती समितीतर्फे ३ जानेवारी रोजी उत्तर सादर केले; पण ८ जानेवारीला हे प्रकरण सुनावणीसाठी आले नाही. अभियंत्यांच्या प्रलंबित प्रश्नांबद्दल पालिकेने अद्याप उत्तर दिलेले नाही, असे समितीच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यावर न्यायालयाने पालिकेला चार दिवसांची मुदत दिली; पण तरीही उत्तर न दिल्यामुळे समिती २७, २८ आणि २९ मे रोजी ठिय्या आंदोलन करणार आहे.